Tuesday 25 September 2012

Swami Vivekananda Quotes on Life in Marathi


Marathi Quotes of Swami Vivekananda


विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास. महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व परकियांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रुढ केलेल्या समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला पण स्वतःवर मात्र नसला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तो अढळ राहुदया आणि शक्तिशाली बना. 

Swami Vivekananda Quotes on Life in Marathi 1



ध्यानात ठेवा कि संपूर्ण जीवन हे देण्याकरिताच आहे. प्रकृती तुम्हास देण्यास भाग पाडील, म्हणून तुम्ही आपखुशीने द्या ... संग्रह करण्याच्या बुद्धीने तुम्ही जीवनात पदार्पण करता, मुठी भरभरून सर्वकाही गोळा करावे असे तुम्हाला वाटते, पण प्रकृती तुमचा गळा दाबून तुम्हाला आपली मुठ उघडावयास भाग पाडते. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला देणे भाग आहे. 'मी देत नाही' असे म्हणताक्षणिच कुठून तरी तडाखा बसतो आणि तुम्ही घायाळ होऊन पडता. या जगात कुणीही नाही की ज्याला आज ना उद्या सर्वस्वाचा त्याग करने भाग पडणार नाही.

 
 स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.



आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.



संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?

No comments:

Post a Comment