Tuesday, 7 May 2013

जहर तुझी नजर .. Najar Marathi Kavita for Lovers


Tujhi najar..Kavita in Marathi


असे जहालसे जहर तुझी नजर 
मनात निर्मिते कहर तुझी नजर 
कितीही ताळतेस शब्द तू तरी  
हळूच देते खबर तुझी नजर 
दिसते तिच्यात अथांगता 
करते मनात घर तुझी नजर 
सखे तुझ्या मिठीत अनंतता 
कशास पाहतेस प्रहर तुझी नजर 
खुशाल जा तुला जिथे हवे तिथे 
जन्मभर मला पुरेल तुझी नजर 
फिरेल जरी भणंग एकटा 
दिसेल रानभर तुझी नजर 
अजूनही तुझ्या मनात उन्हे कशी ?
अजूनही शिंपतेस सर तुझी नजर 

No comments:

Post a Comment