Marathi Kavita for Holi
रंग साठले मनी अंतरी
उधळु त्यांना नभी चला
आला आला रंगोतस्व हा आला ...
अंगास अंग लावू दे
अंगास रंग लावू दे
सण होळीचा आहे
प्रेम रंगात न्हावु दे
दिवस आज मस्तीचा
प्रेमाचा व जबरदस्तीचा
गाली गुलाल फासु दे
थोडीशी मस्ती करू दे
उघडा खांदा रंगवू दे
गोरे तन चिंब करू दे
ओलेति तुला बघू दे
प्रेम रंगात न्हावु दे
तनु रंगात रंगली
सखी संचेल न्ह्याली
वस्त्रे तनुस लिपटली
गुन्हे माफ़ असे होळी
मुठीत रंग, मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्रीरंग रंगु दे
राधे आज होळी खेळू दे
No comments:
Post a Comment